Lifestyle

Steam Therapy in Covid-19: कोविड-19 संसर्ग टाळण्यासाठी स्टीम घेणे प्रभावी आहे का? अभ्यासामध्ये समोर आला धक्कादायक खुलासा


Steam Therapy in Covid-19: कोविड-19 संसर्ग टाळण्यासाठी स्टीम घेणे प्रभावी आहे का? अभ्यासामध्ये समोर आला धक्कादायक खुलासा

Steam Remedy (PC- pixabay)

Steam Remedy in Covid-19: जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूने भारतात कहर केला आहे. या विषाणूमुळे संपूर्ण जगात बर्‍याच प्रमाणात विनाश झाला आहे. भारतातही कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने खळबळ उडाली आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सरकारकडून वारंवार सामाजिक अंतर राखणे, हात धुणे आणि चेहऱ्यावर मास्क लावण्याच्या सूचना देण्यात येत आहेत. यासह, आपल्या शरीराची रोग प्रतिकारशक्ती वाढविण्याचा सल्ला देण्यात येत आहे. तसेच बाहेरून आल्यानंतर कोरोना संसर्ग टाळण्यासाठी दररोज वाफ घेण्याचा सल्लाही अनेक डॉक्टर्सकडून देण्यात येत आहे. (वाचा – Oxygen Concentrators नेमकं काम कसं करतं? कोविड 19 रूग्ण त्याचा वापर कसा, कधी करू शकतो?)

वाफ घेतल्याने Covid-19 बरा होतो का?

नुकत्याच झालेल्या संशोधनानुसार, जगभरात कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी ‘स्टीम थेरपी’ वापरली जात आहे. स्टीम घेण्याचा काहीचं फायदा नाही. स्टीम थेरपीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत अभ्यासात असं म्हटलं आहे की, हा सल्ला केवळ चुकीचा नाही तर लोकांसाठीही धोकादायक ठरू शकतो. (वाचा – Covid-19 Vaccine: लस घेण्यापूर्वी आणि नंतर काय खावे? तज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या)

राउटरमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, कोविडवर उपचार म्हणून स्टीम घेण्याचा सल्ला यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल प्रिव्हेंशन (सीडीसी) किंवा जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) दिलेला नाही. सीडीसीच्या मते, असा कोणताही अभ्यास नाही. ज्याच्या आधारे असा विश्वास केला जाऊ शकतो की स्टीम घेतल्याने शरीरातील कोरोना विषाणूचा प्रभाव कमी होतो किंवा दूर होतो. सध्या यावर अधिक संशोधन होणे आवश्यक असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. याक्षणी या प्रकरणात स्पष्टपणे काहीही सांगितले जाऊ शकत नाही.


Join Our Telegram Channel

Socially Keeda

Socially Keeda, the pioneer of news sources in India operates under the philosophy of keeping its readers informed. SociallyKeeda.com tells the story of India and it offers fresh, compelling content that’s useful and informative for its readers.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker