Lifestyle

Sputnik V Price In India: अक्षय्य तृत्तीयेच्या मुहूर्तावर आज देशात स्फुटनिक वी लसीचा पहिला डोस देत लसीची किंमत जाहीर; 948 रूपये आणि 5% GST मोजावा लागणार


Sputnik V Price In India: अक्षय्य तृत्तीयेच्या मुहूर्तावर आज देशात स्फुटनिक वी लसीचा पहिला डोस देत लसीची किंमत जाहीर; 948 रूपये आणि 5% GST मोजावा लागणार

- Advertisement-

Picture used for Representational goal solely | File Picture

Related Articles
- Advertisement-

भारतामध्ये कोवॅक्सिन, कोविशिल्ड यांच्यासोबतीने आता स्फुटनिक वी ही तिसरी लसदेखील उपलब्ध झाली आहे. आज (14 मे) अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर या लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. सध्या स्फुटनिक वी (Sputnik V) लसीच्या 2 खेपी भारतामध्ये दाखल झाल्या आहेत. त्यांना भारताच्या हिमाचल प्रदेशातील Kasauli येथील Central Medicine Laboratory कडून परवानगी मिळाल्यानंतर आजपासून ही लस नागरिकांसाठी खुली करण्यात आली आहे. सध्या मर्यादित साठा असल्याने ही लस मोजक्या ठिकाणी उपलब्ध आहे. हैदराबाद मध्ये डॉ. रेड्डीज लॅबचे World Head of Customized Pharma Companies,Deepak Sapra यांना ही पहिली लस देण्यात आली आहे.

भारतातील इतर लसींप्रमाणेच स्फुटनिक वी चे देखील 2 डोस द्यावे लागणार आहेत. ही देशात नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेली पहिली परदेशी लस आहे. या लसीची प्रभाव देखील 90% जवळ आहे. दरम्यान भारतात आता या लसीचे उत्पादन सुरू केले जाणार आहे. आज डॉ. रेड्डीज लॅब कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, स्फुटनिक वी लसीची किंमत 948 रूपये आणि 5% जीएसटी म्हणजे 995 रूपये प्रतिडोस आकारण्यात आला आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, भारतामध्ये जसजसे या लसीचे उत्पादन वाढेल तसे या लसीच्या किंमतीमध्ये देखील घसरण होणार आहे. Sputnik V Vaccine Replace: भारतामध्ये HETERO सोबत RDIF करणार कोविड 19 वरील लसीचं उत्पादन.

हैदराबाद मध्ये देण्यात आलेला आज पहिला डोस

भारतामध्ये सध्या केंद्र सरकारकडून 45 वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाचा कार्यक्रम सुरू आहे तर राज्य सरकार 18-44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करत आहे. या दोन्ही मोफत आहेत. सध्याच्या घडीला भारतामध्ये 18 कोटीपेक्षा अधिक लसीचे डोस देण्यात आले आहेत. तर कोरोनाच्या तिसर्‍या लाटेला रोखण्यासाठी आता लसीकरण वेगवान करण्याचे सरकार प्रयत्न करत आहे.
Download Now

Socially Keeda

Socially Keeda, the pioneer of news sources in India operates under the philosophy of keeping its readers informed. SociallyKeeda.com tells the story of India and it offers fresh, compelling content that’s useful and informative for its readers.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker