Sex Tips For Men: हॉट सेक्ससाठी पुरुषांनी आर्वजून करायला हव्या ‘या’ गोष्टी


प्रातिनिधिक प्रतिमा (Photograph Credit: Pixabay)
कितीही प्रयत्न केले तरीही आपल्या महिला पार्टनरसोबत शारीरिक संबंध (Bodily Relationship) ठेवण्यास आपण कुठे ना कुठे कमी पडतो अशी अनेक पुरुषांची तक्रार असते. महिला जोडीदाराला सेक्ससाठी (Intercourse) तयार करणे ही काही साधीसोपी गोष्ट नाही. तसेच शारीरिक संबंध अन्य वेळी त्यांच्याशी तुसडेपणाने वागत असाल तर महिला त्या गोष्टीचा चुकीचा अर्थ काढतात. यासाठी महिलांना रिझविण्यासाठी काही ठराविक गोष्टी पुरुषांनी केल्या पाहिजेत. अशा गोष्टी ज्यामुळे महिला जोडीदार आपोआपच सेक्ससाठी तयार होतील.
ही गोष्ट ऐकायला जरी अशक्य वाटत असली तरी असे होऊ शकते बरं का! पुरुषांनी काही गोष्टी केल्या तर महिला पार्टनर आपोआपच त्यांच्याकडे आकर्षिल्या जातात.
1. चांगली बॉडी बनवा
जसं पुरुषांनी हॉट फिगर असलेल्या स्त्रिया आवडतात तसे स्त्रियांनी देखील चांगले पिळदार शरीर असणारे पुरुष आवडतात. यासाठी पुरुषांनी नियमितपणे व्यायाम करुन चांगली देहयष्टी बनवा. ज्यामुळे स्त्रिया तुमच्याकडे आकर्षिल्या जातील.हेदेखील वाचा- Intercourse Ideas: आपल्या पुरुष पार्टनरला बेडवर अधिक काळ रोखून ठेवण्यासाठी खास सेक्स टिप्स
2. हेल्थी गोष्टी खा
पुरुषांना जर काही व्यसन असेल तर अनेक स्त्रियांना ते आवडत नाही. अशा वेळी पुरुषांनी आरोग्यदायी पदार्थांचे सेवन केल्यास त्यांचे आरोग्य चांगले राहते आणि त्यांच्या मनावरील तणाव देखील कमी होती. तसेच तुमच्या शरीरातील कोलेस्टेरॉल नियंत्रणात राहते.
3. घरातील कामांमध्ये स्त्रियांना मदत करा
आपले पुरुष आपल्याला घरातील कामांमध्ये काहीएक मदत करत नाही. त्यामुळे आपली खूप दमछाक होते असे अनेक स्त्रियांना वाटते. त्यामुळे रात्री सेक्स दरम्यान त्यांच्या अंगात त्राण उरत नाही. अशा वेळी जेव्हा केव्हा तुम्ही घरी असाल तर स्त्रियांना घरातील कामांमध्ये मदत करा. ज्याचे चांगले परिणाम तुम्हाला रात्री बेडवर नक्की पाहायला मिळतील.
4. सेक्सविषयी बातचीत करा
अनेक स्त्रिया आपल्या पुरुष जोडीदारासोबत खुलेपणाने सेक्सबद्दल बोलण्यास थोड्या लाजतात. अशा वेळी तुम्ही पुढाकार घेऊन महिला जोडीदाराला विश्वासात घेऊन सेक्सवर बातचीत करा. महिलेच्या मनात सेक्सविषयी काही अडी असतील तर तुमच्या बोलण्यातून त्या दूर करा.
या काही ठराविक गोष्टी ध्यानात ठेवल्यात तर पुरुषांना आपल्या महिला पार्टनरला सेक्ससाठी रिझवता आलेच म्हणून समजा. सेक्सबाबत महिला पुरुषांइतक्या फॉरवर्ड नसतात. मात्र तुम्ही वर दिलेल्या गोष्टी केल्यात तर तुम्हाला नक्कीच चांगले परिणाम पाहायला मिळतील.
(टीप- या लेखात दिलेली माहिती ही प्राप्त माहितीनुसार आहे. या माहितीची लेटेस्टली मराठी पुष्टी करत नाही.)