EVENTS & FESTIVALS

Sankashti Chaturthi 2021: आज संकष्टी चतुर्थी असल्याने ‘या’ पद्धतीने पूजा केल्यास प्रसन्न होईल गणपती

Rate this post


Sankashti Chaturthi 2021: आज संकष्टी चतुर्थी असल्याने 'या' पद्धतीने पूजा केल्यास प्रसन्न होईल गणपती
- Advertisement-

Shree Siddhivinayak Ganpati (PC – Fb)

- Advertisement-

Sankashti Chaturthi 2021:  आज सर्वत्र संकष्टी चतुर्थी साजरी केली जात आहे. त्यामुळे आजच्या दिवशी गणपतीची संपूर्ण पूजा-विधीसह पूजा अर्चना केली जाते. हिंदू धर्मात कोणत्याही शुभ कार्यापूर्वी गणपतीची प्रार्थना केली जाते. तर संकष्टी चतुर्थीचा अर्थ असा होतो की, संकट दूर करणारी चतुर्थी. अशी मान्यता आहे की, संकष्ट चतुर्थी दिनानिमित्त भगवान गणपतीची पूजा केल्यास सर्व समस्या दूर होण्यासह आपल्या मनातील इच्छा सुद्धा पूर्ण होतात.(राशीभविष्य 30 एप्रिल 2021: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस)

संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला साजरी केली जाते. पौर्णिमेनंतर येणारी चतुर्थी संकष्टी चतुर्थी आणि अमावस्येनंतरच्या चतुर्थीला विनायक चतुर्थी म्हणतात. संकष्टी चतुर्थीला गणपीची पूजा करुन विशेष आशीर्वाद सुद्धा मिळवले जाऊ शकतात. तर संकष्टी चतुर्थीचा चंद्रोदय 10.40 मिनिटांनी असणार आहे.

- Advertisement-

गणपतीची पूजा करणारे आजच्या दिवशी उपवास ठेवत त्याची पूजा करतात. स्नान केल्यानंतर स्वच्छ लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्र परिधान करा. गणपतीची मूर्ती किंवा फोटोच्या येथे लाल रंगाचा कपडा अंथरा. तर पूजा करताना तुम्ही उत्तर दिशेला तोंड करुन बसा. भगवान गणपतीच्या पूजेवेळी दिवा लावून लाल रंगाच्या गुलाबांनी सजवा. त्याचसोबत पूजा करताना गणपतीच्या मंत्रांचा जाप करण्यास विसरु नका.(Sankashti Chaturthi Particular Rangoli: संकष्टी चतुर्थी निमित्त बाप्पाचं रूप रांंगोळीतून साकारून दिवसाची करा मंगलमय सुरूवात!)

असे मानले जाते की, संकष्टीच्या दिवशी गणपतीची विशेष रुपाने पूजा केल्यास नकारात्मक प्रभाव दूर होतात. गणपती घरातील सर्व समस्या दूर करतो असे ही म्हणतात. त्यामुळे जो व्यक्ती आजच्या दिवशी व्रत ठेवतो आणि पूर्ण आस्थेसह पूजा करतो त्याचा गणपती प्रसन्न होऊन त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. तर हे व्रत सूर्योदयापासून सुरु होते आणि चंद्र दर्शनानंतर पूर्ण होते.

- Advertisement-
Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker
close button