EVENTS & FESTIVALS

Rama Navami 2021: यंदा श्रीराम नवमी च्या दिवशी 9 वर्षांनंतर जुळून आलाय ‘असा’ शुभ योगायोग!

Rate this post


Rama Navami 2021: यंदा श्रीराम नवमी च्या दिवशी 9 वर्षांनंतर जुळून आलाय 'असा' शुभ योगायोग!
- Advertisement-

Ram Navami 2021 (File Picture)

- Advertisement-

मर्यादापुरूषोत्तम म्हणून ज्यांची ओळख आहे अशा भगवान श्रीरामांचा (Lord Shree Ram) जन्मदिवस हा रामनवमी (Ram Navami)  म्हणून साजरा केला जातो. आज चैत्र नवरात्रीचा शेवटचा दिवस म्हणजे राम नवमी. हिंदू बांधव राम नवमी दिवशी भगवान श्रीरामाची आराधना करण्यासोबतच मध्यान्हाला राम जन्मोत्सव (Ram Janmotsav)  साजरा करतात. काही राम भक्त या दिवशी दिवसभराचं व्रत करतात. पण यंदाची रामनवमी थोडी विशेष आहे. यंदा ज्योतिषशास्त्राच्या मानण्यानुसार 9 वर्षांनंतर पुन्हा राम नवमीला 5 ग्रहांच्या युतीचा दुर्मिळ योगायोग आहे. Blissful Ram Navami Needs in Marathi: श्रीराम नवमी निमित्त मराठमोळे Greetings, WhatsApp Standing, Messages शेअर करून रामभक्तांना द्या खास शुभेच्छा!

भगवान श्रीरामाचा जन्म हा कर्क आरोह्यामध्ये व दुपारी 12 वाजता झाला होता. या दिवशी अश्लेषा नक्षत्र, लग्न घरात चंद्र, शनि सातव्या घरात, सूर्य, बुध आणि शुक्र हे दहाव्या घरामध्ये होते. हा योगायोग बुधवार दिवशी जुळून आल्याने तो अनेक अर्थाने शुभ झाला आहे. राम नवमीच्या दिवशी शुभ वेळेमध्ये पूजा आणि खरेदी केली तर ती फायदेशीर ठरते असा समज आहे. श्रीरामांची राशी आणि लग्न राशी कर्क आहे. लग्नात चंद्र देखील असल्याने हा योग आनंद, शांती देणारा योग आहे. तसेच अश्लेषा नक्षत्र या दिवसाच्या शुभ असण्यामध्ये भर टाकत असल्याने हा योग शुभदायी मानला जातो. Ram Navami 2021: राम नवमीचा उपवास करण्यापूर्वी ‘ही’ महत्वाची माहिती नक्की जाणून घ्या.

आज दुपारी मध्यान्हावर म्हनजे ठीक 12 वाजता राम जन्म साजरा केला जातो. आजच्या दिवशी मध्यमाचा काळ हा दुपारी 11:02 ते 1:38 दुपारी वाजेपर्यंत असल्याने या काळात शुभ कार्याची सुरूवात करणं हितावह आहे.

- Advertisement-

दरम्यान भगवान श्रीराम हे भगवान विष्णूचा 7वा अवतार असल्याचं समजलं जातं. त्यांनी सूर्यवंशी इक्ष्वाकु कुळात राजा दशरथ आणि राणी कौशल्या यांच्या पोटी जन्म घेतला होता. भगवान श्रीराम हे एकवचनी, एकपत्नी असण्यासोबतच त्यांचे भावंडांप्रती प्रेम, आई वडीलांप्रती असणारी श्रद्धा आदर्शव्रत होती.

टीप- सदर लेख केवळ माहिती देण्याच्या उद्देशाने लिहला आहे. यामधील कोणत्याही गोष्टीची लेटेस्टली मराठी पुष्टी करत नाही.

- Advertisement-
Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker
close button