Pandharpur Maghi Ekadashi 2021: जया एकादशी निमित्त विठ्ठल-रूक्मिणीची पूजा संपन्न; पहा पंढरपूरातील मंदिरात केलेली आकर्षक सजावट


Maghi Ekadashi 2021 | Picture Credit: Twitter/PandharpurVR
माघी एकादशी (Maghi Ekadashi) निमित्त आज पंढरपूरच्या विठ्ठल -रुक्मिणी मंदिरामध्ये (Vitthal Rukmini Mandir) सोहळा पार पडला. काल रात्रीपासून मंदिर परिसरामध्ये संचारबंदी असली तरीही मोजक्याच लोकांच्या उपस्थितीमध्ये आजची जया एकादशी (Jaya Ekadashi) निमित्तची पूजा पार पडली आहे. माघी एकादशी निमित्त ची शासकीय पूजा ही मंदिरामध्ये समिती सदस्या अॅड्व्हकेट माधवी निगडे यांच्या हस्ते पार पडली आहे. यावेळेस मंदिरामध्ये रूक्मिणी मातेची पूजा मंदीर समितीचे सदस्य ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज जळगांवकर यांच्या उपस्थित संपन्न झाली. Jaya Ekadashi 2021: जया एकादशी कधी आहे? जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजाविधी आणि धार्मिक महत्त्व.
Table of Contents
दरम्यान आज माघी यात्रेनिमित्त विठ्ठल रूक्मिणी मंदिरामध्ये विठूमाऊली आणि रूक्मिणी मातेच्या गाभार्यात आकर्षक फूलांची आरास केली आहे. यामध्ये विठूराया गरूडावर तर रूक्मिणी मातेला कलशामध्ये अशा आकर्षण सजावटीमध्ये ठेवण्यात आले आहे. माघी यात्रेसाठी रात्री बारा वाजेपासून उद्या रात्री बारा वाजेपर्यंत शहर व शेजारील 10 गावात संचारबंदी लागू केली आहे.
माघी एकादशी 2021 निमित्त आकर्षक सजावट
माघी वारी जया एकादशी निमित्त श्री.विठ्ठल व रूक्मिणीमातेच्या गाभाऱ्यात तसेच मंदिरात फुलापासून सुंदर व मनमोहक अशी नयनरम्य फुलाची आरास करण्यात आली आहे…
व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
आवडल्यास YouTube channel ला SUBSCRIBE करा. pic.twitter.com/ZN4Mo7n5Pp
— 🚩 Krushna Mulik 🚩 (@Kr_Mulik) February 23, 2021
आज मंदिर बंद असले तरीही अनेक पारंपारिक दिंड्या दाखल झाल्या आहेत. वारीसाठी मंदिराकडे जाणारा मार्ग बंद असल्याने प्रदक्षिणा मार्गावर वारकरी टाळ-मृदुंगाच्या नादात गजर करत आहेत. चंद्रभागेच्या नदीत स्नान करून आणि कळसाचं दर्शन घेऊन अनेक वारकर्यांना परतावे लागणार आहे.