Lifestyle

ICMR कडून Dry Swab RT-PCR COVID-19 Test ला परवानगी; आता कोविड टेस्टिंग होणार वेगवान

NOTE: PAGE CONTENT AUTO GENERATED
ICMR कडून Dry Swab RT-PCR COVID-19 Test ला परवानगी; आता कोविड टेस्टिंग होणार वेगवान

Covid 19 Check | Representational Picture | (Picture Credit: PTI)

ICMR कडून CSIR institute च्या ड्राय स्वॅब आरटीपीआर टेस्टला परवानगी देण्यात आली आहे. ही टेस्ट Centre for Mobile & Molecular Biology (CCMB) कडून विकसित करण्यात आली आहे. नॉर्मल आरटीपीसीआर च्या तुलनेत ही ड्राय आरटीपीसीआर टेस्ट 30-40% स्वस्त आहे. तसेच ही रिपोर्ट देखील लवकर देत असल्याने आता ही अधिक फायदेशीर ठरणार असल्याचं चित्र आहे. एप्रिल 2020 पासून तिच्या वापराला सुरूवात करून संबंधित कर्मचार्‍यांना ती कशी वापरायची याचं प्रशिक्षण देण्याचं काम सुरू आहे.

ड्राय स्वॅब आरटीपीसीआर टेस्ट ही नॉर्मल आरटीपीसीआर मधील एक व्हेरिएशन असणार आहे. ही RNA-extraction-free testing technique आहे. असेदेखील सांगण्यात आले आहे. (Feluda Paper Strip Check: कोविड19 च्या निदानासाठी अचूक, झटपट निकाल देणार्‍या नव्या चाचणीसाठी ICMR ची नियमावली जारी; जाणून या टेस्टची वैशिष्ट्यं).

RT-PCR आणि DArRT-PCR मधील फरक काय आहे?

ड्राय स्वॅब आरटीपीसीआर मध्ये नेसल स्वॅब म्हणजेच नाकातील घेतलेला नमूना गोळा कडून सुक्या अवस्थेमध्ये जमा करेल. सध्याच्या आरटीपीसीआर मध्ये त्यासाठी वायरल ट्रान्स्पोर्ट मिडीयम वापरलं जातं. नव्या पद्धतीमध्ये आता VTM आणि RNA isolation या दोन पायर्‍या वगळल्या जातील. RT-PCR, Antigen, Antibody Check: कोविड 19 चं निदान करण्यासाठी केल्या जाणार्‍या विविध COVID Assessments टेस्ट मधील नेमका फरक काय ते कोणती चाचणी कधी करावी?

ड्राय स्वॅब टेस्टचे फायदे काय आहेत?

  • ड्राय टेस्ट मध्ये आता नमून सांडून त्याचा संसर्ग पसरण्याची शक्यता कमी झाली आहे. नमून ड्राय असल्याने ते व्यवस्थित लॅब पर्यंत पोहचवणं सुकर झालं आहे.
  • वाढत्या कोरोनारूग्णसंख्येमुळे अधिक रूग्णांना तपासण्यासाठी आता ही ड्राय टेस्ट मदत करेल त्यामुळे पूर्वीच्या आरटीपीसीआर टेस्ट वरील भार कमी होणार आहे.
  • आता ड्राय स्वॅब टेस्ट मध्ये RNA-extraction करावे लागत नसल्याने बराच वेळ वाचला आहे आणि प्रशिक्षित कर्मचार्‍यांची फौज कमी झाली.
  • अधिकची गुंतवणूक न करताच आता 2-3 पटींनी टेस्टिंग वाढवणं शक्य होणार आहे.
  • ड्राय टेस्ट आता अवघ्या 3 तासांमध्ये रिपोर्ट देऊ शकते.

CSIR-CCMB चे डिरेक्टर Dr. Rakesh Okay Mishra यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही नवी टेस्ट सोपी, स्वस्त आणि वेगवान आहे. आरोग्य कर्मचार्‍यांसाठीही सुरक्षित आहे. Apollo Hospitals आणि Meril Life Pvt Ltd कडून त्याचे कीट्स मिळणं अपेक्षित आहे. अंदाजे 50 हजार टेस्ट या नव्या ड्राय स्वॅब आरटीपीसीआर ने करून झाल्या आहेत.


Join Telegram Download Server 1 Download Server 2 Socially Trend Viral News

Socially Keeda

Socially Keeda, the pioneer of news sources in India operates under the philosophy of keeping its readers informed. SociallyKeeda.com tells the story of India and it offers fresh, compelling content that’s useful and informative for its readers.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker