Lifestyle

Double Masking: कोरोना संसर्गाचा धोका कमी करण्यासाठी डबल मास्किंग खरंच फायदेशीर आहे? पहा हे कुणी, कधी, कसं करावं?


Double Masking: कोरोना संसर्गाचा धोका कमी करण्यासाठी डबल मास्किंग खरंच फायदेशीर आहे? पहा हे कुणी, कधी, कसं करावं?

Double Masks | Photograph Credit: Pixabay.com

भारतामध्ये कोरोना वायरसची दुसरी लाट (Coronavirus Second Wave) ही प्रचंड वेगाने आली आहे. महाराष्ट्रात कोरोना वायरसच्या म्युटेशनची शक्यता वर्तवण्यात आल्यानंतर आता आपण अधिक इंफेक्शिअस म्हणजे अधिक तीव्रतेने संसर्ग करू शकणार्‍या वायरससोबत लढत आहोत असे तज्ञांचे मत आहे. त्यामुळे पूर्वीपेक्षा आपण आता अधिक सजग राहणं गरजेचे आहे.सुरक्षेच्या दृष्टीने केलेला थोडासाही हलगर्जीपणा आता रूग्णांच्या जीवावर बेतत असल्याचं चित्र पहायला मिळालं आहे. त्यामुळे वेळीच या आजाराचा धोका ओळखणं गरजेचे आहे. कोरोना संसर्गापासून दूर राहण्याच्या त्रिसुत्रीपैकी एक म्हणजे मास्क (Masks) घालणं. सध्या वाढता संसर्ग पाहता डबल मास्क घालण्याचा सल्ला तुम्ही ऐकला किंवा बघितला असेलच. पण खरचं डबल मास्क (Double Masking) म्हणजे डबल प्रोटेक्शन आणि संसर्गाचा धोका संपला असं होतं का? डबल मास्कचा फायदा किती तोटा किती हे जाणून घेऊनच हा सल्ला पाळा.

दरम्यान कोरोना संसर्गापासून सुरक्षित राहण्यासाठी तुम्हांला अनावश्यक बाहेर पडणं, एकमेकांच्या संपर्कामध्ये येणं हे टाळलंच पाहिजे. पण तुम्हांला काही कारणास्तव बाहेर पडावं लागलंच तर तुम्हांला काळजी घेणं आवशयक आहे. सध्या बाहेर पडताना तुम्ही जर N95 मास्क वापरत असाल तर तो डबल वापरण्याची गरज नाही. मात्र कापडी किंवा सर्जिकल मास्क वापरत असाल तर मात्र ते दोन वापरू शकतात. Surgical Masks उलटा घातल्याने Corona Virus पासून बचाव होण्यास अधिक फायदेशीर असल्याचा दावा खोटा! जाणून घ्या तज्ञांचा सल्ला.

डबल मास्क म्हणजे डबल प्रोटेक्शन?

कोविड 19 संसर्गापासून सुरक्षित राहण्यासाठी कोनताच ठोस आणि 100% प्रभावी पर्याय उपलब्ध नाही. पण डबल मास्क मुळे तुम्हांला धोका कमी करता येऊ शकतो. CDC च्या अभ्यासानुसार, तुम्हांला डबल मास्कमुळे संसर्गाचे प्रमाण कमी करण्याला मदत होऊ शकते. एकापेक्षा दोन मास्क परिधान केल्याने तुम्हांला संसर्गाला रोखण्यास मदत होऊ शकते.

अनेकदा एकच मास्क असेल तर तो चेहर्‍याला नाकाजवळ, तोंडाजवळ नीट बसला नाही. कुठूनही सरकलेला असेल तर त्याच्यामुळे कळत नकळत वायरस कळत नकळत शरीरात प्रवेश करू शकतो. युनिव्हर्सिटी ऑफ नॉर्थ कॅरोलिनाच्या अभ्यासानुसार, डबल मास्कमुळे वायरसच्या फिल्टरेशन मध्ये प्रभावीपणा वाढू शकतो. वायरस व्यक्तीच्या नाका-तोंडापर्यंत पोहचण्याची शक्यता मंदावते.

डबल मास्क कोणी, कधी कसा वापरायचा?

फोर्टीस हॉस्पिटल कल्याणच्या इंफेक्शन डिसीस स्पेशॅलिस्ट डॉ. कीर्ती सबनीस यांच्या माहितीनुसार, डबल मास्क हा गर्दीच्या ठिकाणी म्हणजेच एअरपोर्ट, बस स्टॅन्ड किंवा सार्वजनिक वाहतूक सेवा वापरत असताना वापरा. सर्जिकल मास्क वर कापडी मास्क किंवा दोन कापडी मास्क अशा पद्धतीने तुम्ही डबल मास्क वापरू शकता. खूपच गर्दी असेल अशा ठिकाणी मास्क आणि फेस शिल्ड चा वापर करू शकता. N95 मास्क वापरत असाल तर तो डबल वापरू नका. लहान मुलांना डबल मास्क वापरायला देऊ नका.

मास्क वापरताना कोणती काळजी घ्याल?

  • मास्क वापरताना तो चेहर्‍यावर नीट राहतोय याची काळजी घ्या. नाक, तोंड नीट झाकलं जातंय याची काळजी घ्या.
  • इतरांसोबत मास्क शेअर करू नका. सर्जिकल मास्क पुन्हा धुवून वापरू नका.
  • ओला, दमट मास्क वापरू नका. मास्क वापरल्यानंतर तो कचर्‍याच्या बंद डब्यात टाका.
  • मास्कचा वापर केल्यानंतर तो रियुजेबल असेल तर कापडी मास्क गरम पाण्यात किंवा निर्जुंतुकीकरण करू शकू अशा पाण्यात स्वच्छ धुवा. तसेच तो किमान 6 महिने किंवा 30 वेळा वापरल्यानंतर पुन्हा पुन्हा वापरणं टाळा.
  • बोलताना, शिंकताना मास्क काढणं टाळा. तसेच सारखा मास्कला हात लावणं देखील टाळा.

सध्या कोरोना वायरस विरूद्धच्या लढाईमध्ये प्रतिबंधात्मक लस हा शस्त्र म्हणून वापर केला जात आहे. त्यामुळे आता 1 मे पासून 18 वर्षांवरील सार्‍यांनाच सरसकट लस देण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला आहे. यामुळे कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मदत होणार आहे.
Download Server Watch Online Full HD

Socially Keeda

Socially Keeda, the pioneer of news sources in India operates under the philosophy of keeping its readers informed. SociallyKeeda.com tells the story of India and it offers fresh, compelling content that’s useful and informative for its readers.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker